महिलेची हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून फरार आरोपीला १२ तासात अटक
पिंपरी चिंचवड : विठ्ठलवाडी येथे एका महिलेचा खून केल्याची घटना रविवारी (दि. 6) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला 12 तासात अटक केली आहे
रितू श्याम ढेरे (वय 20) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश दीपक दरेकर (वय 25) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर श्याम राजू ढेरे (रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी. मूळ रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की, जय मल्हार निवास रूम.नं. १ सर्वे नं. ३५/३ विठ्ठलवाडी ,उपकार चेबर्सचे जवळ आकुर्डी पुणे येथे खुन झाला आहे.अशी माहीती मिळाल्यानंतर निगडी पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी व अंमलदार,तपास पथक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसाना कॉल करणारे घर मालक हे तेथे हजर होते.
त्यानंतर पोलीस आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शन घेवून तीन टिम निगडी पोलीस ठाणे व एक टिम युनिट २ ची अशा चार टिम तयार करण्यात आल्या. त्यानंतर घरमालक यांचेकडे तपास सुरू केला असता त्यांनी सांगितले की रूम नं१ ही दि. दि.१३/०९/२०२१ रोजी ११ महिनाच्या भांडे करारनामा करून शाम राजु डेरे यास रुम भाडयाने दिली आहे.
त्यानंतर घरमालकांनी शाम राजु डेरे यास घरी कोणकोण राहणार आहे.असे विचारले असता त्यावेळी शाम डेरे याने पत्नी रितु हिची ओळख करून दिली आम्ही दोघे राहणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर घरमालक प्रथमेश दरेकर यांना भाडेकरू शाम डेरे याने त्याचा मोबाईल नंबर ७४९८४३६९७७ यावरून घर मालक प्रथमेश दरेकर यांचा मोबाईल ९६२३९६७०९० यावर २.४७ वा.”हाय भाऊ माझ्या रूम मध्ये खुन झाला आहे.तुम्ही सकाळी लवकर या परत ०२.४८ वा.माझा फोन बंद आहे. परत ०२.४९ वा. तुम्ही कुलुप तोडा आणि पोलीसांना सांगा परत ०३.०९ वा. लवकर जा सकाळी माझ्या रुमवर ०३.१० वा.माझ्या रूम मध्ये बॉडी आहे” असे ०७ मेसेज पाठविले त्यानंतर घरमालक दरेकर यांनी शाम डेरे यांना फोन केला असता फोन बंद होता. अशी माहीती प्रथमेश दरेकर यांनी दिली. यावरून पोलीसांचा संशय बळावला त्यानंतर पोलीसांनी सदर रूमचे कुलुप तोडून आत प्रवेश केला असता रूममध्ये व किचनमध्ये सामान अस्थव्यवस्त पडलेले होते व संडासचा दरवाजा थोडास उघडा होता. व आतुन दुर्गंधी येत होती. दरवाजा दोघा तिघांनी ढकलून ही निघत नव्हता त्यामुळे दरवाजामध्ये हात टाकून मोबाईल व्दारे फोटो व शुटिंग केली असता.
आतमध्ये स्त्रीची फुगलेली बॉडी दिसून आली त्यानंतर पोलीसांनी फायरब्रिगेड बोलावुन त्यांचे मार्फतीने संडासाचा दार तोडून बॉडी बाहेर काढली असता सदर मयत स्त्रीचे प्रेत फुगलेले, दोन्ही डोळे बाहेर आलेले, जिभ बाहेर आलेली दिसुन आली व गळ्या भोवती ओढणी गुडाळलेली दिसून आली व अतिशय दुर्गधी येत होती. सदरचे प्रेत पाहून त्या घरात राहणारी रितु भालेराव हीचे आहे किंवा नाही ते ओळखणे कठिण झाले होते. सदरचे प्रेत हे रितु भालेरावचे असेलतर तिचा खुन तिचा शाम डेरे नी केला की, इतर कोणी अज्ञात इसमांनी खुन करून शाम डेरेच्या मोबाईल फोन वरून घर मालकांना मेसेज पाठविले याबाबत पोलासांना ब-याच शंका निर्माण झाल्या होत्या.
तसेच घरमालकाकडे मिळालेल्या भाडे करारनामा वरून शाम राजु डेरे याचा पत्ता रा. शाहपुर दाढेगाव ता.अंबड जि.जालना असलेला मिळाला. त्यानंतर पोलीसांनी शेजा-यांनकडे तपास केला असता शेजा-यांनी सांगितले की, दि.०५/०३/२०२२ रोजी ०४.३० वा.सुमारास शाम डेरे हा घाबरलेल्या स्थितीत घराला घाईघाईत कुलुप लावून निघून गेला आहे. त्यानंतर पोलीसांनी रितु भालेराव, शाम डेरे यांच्या मिळालेल्या फोन वरून तांत्रिक विश्लेषण करून शाम डेरे यांचे काही मित्र ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करून दोघांचेपण आई वडीलांकडे व नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मयत स्त्री ही रितु भालेराव असून रितु भालेराव व शाम डेरे हे आपआपासात नातेवाईक असून शाम डेरे हा मयत मुलगी
रितु भालेराव हिच्या वडीलांच्या चुलत बहीणीचा मुलगा (नात्याने आतेभाऊ) असल्याचे निष्पन्न झाले.शाम डेरे यानेच रितु भालेराव हीचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी विरुध्द निगडी पोलीस ठाणे येथे घर मालक प्रथमेश दरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.र.न. १४९/२०२२ भा.द.वि.क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शाम राजु डेरे याला ताब्यात घेवून निगडी पोलीस ठाणेस आणून दि. ०७/०३/२०२२ रोजी रात्रौ ०२/३० वा. अटक
करण्यात आली आहे. एंकदरीत सदर गुतागुतींचे गुन्हयाचा तपास १२ तासाचे आत उघड करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!