दारुच्या नशेत झालेल्या वादातून धनकवडीच्या स्मशानभूमीत तरुणावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

धनकवडी :

दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून एका मित्राने दुसर्‍या मित्राच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून, पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना धनकवडी स्मशानभूमीत (रविवारी) रात्री दिडच्या सुमारास घडली.  यामध्ये घटनेत सुरज ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भाजला आहे.सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सुरज ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भाजला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांनी सांगितले. सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज विजय मरळ (वय २८ वर्षे, राहणार जिवनधारानगर, धनकवडी ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोविंद उर्फ सत्येंद्र यादव, राहणार (मागंडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी सुरज मरळ याचे धनकवडीमध्ये कपडे विक्रीचे छोटेसे दुकान होते. लॉक डाऊनमध्ये ते बंद पडल्याने तो सध्या घरातूनच कपड्यांची विक्री करतो. तर आरोपी गोविंद हा त्याला बालपणापासूनचा मित्र आहे. तो सध्या कोणतेही कामधंदे करत नाही. रविवारी सुरज हा कपडे विक्रीचे पैसे गोळाकरत असताना, त्याला गोविंद रस्त्यामध्ये भेटला.त्यानंतर दोघेजण एका बिअर बारमध्ये दारु पिण्यासाठी गेले. तेथे दोघे दारू पिले. त्यानंतर धनकवडी स्मशानमुभीत जावून गप्पा मारत बसले होते. रात्री दिडच्या सुमारास दोघांत वाद झाला. त्यावेळी गोविंद याने सुरजच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला.  यानंतर सुरजने वडिलांच्या गाडीत भरण्यासाठी आणलेली पेट्रोलची बाटली गोविंदने घेतली. यातील पेट्रोल सुरज्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले. सुरजने कसाबसा जखमी अवस्थेत आपला जीव वाचवला.  दरम्यान गोविंद घटनास्थळावरुन पळून गेला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.