घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारास अटक, वाकडं पोलिसांची कामगिरी

पिंपरी चिंचवड : घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारास वाकडं पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडुन ४ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागीने,मोबाईल फोन व दुचाकी जप्त करण्यात आले आहे.

स्वप्निल ऊर्फ मायकल शंकर कुडवे (वय २० वर्षे, रा. लिंक
रोड पत्राशेड, तीन स्मशान भुमीजवळ, चिंचवड, पुणे २) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्यासोबत १६ वर्षीय मुलाला सुद्धा ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडं पोलिस हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी पेट्रालिंग करीत होते. त्यादरम्यान ते प्रसुनधाम रोड, गंगा ओशियाना सोसायटीचे जवळ आले असता, सदर ठिकाणी एका मोपेड दुचाकीवर दोन संशयीत व्यक्ती जाताना त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबणेचा इशारा दिला असता ते न थांबता पळुन जावु लागले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडले.

त्यांचेजवळील मोपेड दुचाकी व त्यांचेजवळील फोनबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना अधिक तपासकामी वाकड पोलीस ठाणे येथे आणुन, त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी मिळुन मोपेड होंडा डिओ दुचाकी क्र. एम.एच. १२ पी एफ
५५४४ हिचा वापर करून पिंपरी चिंचवड परीसरातील वाकड व चिखली परीसरातील बंद घरांचे घरुफोडी करुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन एकुण खालील ०६ गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांचेकडुन तपासा दरम्यान वर नमुद घरफोडी गुन्हयातील चोरीला गेलेले ६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व १४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने, ०४ मोबाईल फोन व गुन्हा करतवेळी वापरलेली अॅक्टीव्हा दुचाकी असा एकुण ४ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.