शस्त्र बाळगल्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पिंपरी चिंचवड : शस्त्र बाळगल्या दोन सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे  करण्यात आली.त्यांच्याकडून दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत

बाबा सैफन शेख (वय 25, पिंपळे गुरव), अक्षय अण्णा रणदिवे (वय 27, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड, भोसरी येथील बावन्न खोल्याजवळ दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन बाबा शेख आणि अक्षय रणदिवे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी बाबा शेख याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, जबरी चोरीचे सांगवी पोलीस ठाण्यात पाच, चतुश्रृंगी, शिवाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी अक्षय रणदिवे याच्या विरोधात दरोड्याच्या तयारीचा भोसरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.