केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध आंदोलन

पिंपरी चिंचवड : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले आहेत. नाभिक संघटनेने त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत निषेध आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे करण्यात आले.“रावसाहेब दानवे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी केले जाणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व रावसाहेब दानवे यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरा समोर प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.दानवे विरोधात घोषणा देत निषेध नोदवण्य त आला तहसील कार्यालय जिल्हा अधिकारी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या कडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

यावेळी शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, सतीश दादा दरेकर प्रदेश अध्यक्ष कुंभार समाज अध्यक्ष, विशाल जाधव युवा प्रदेशाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, सोमनाथ शेळके जिल्हाध्यक्ष अनिता मगर ,जिल्हाध्यक्ष महिला महेश भागवत, पिंपरी चिंचवड संतोष कुमावत, बेलदार समाज विनोद शिंदे, कृष्णराव गिर गुने धनगर समाज महेश गवस, मराठा महासंघ अध्यक्ष ज्येष्ठ नेते पांडुरंग दोडके, पुंडलिक सैंदाणे ,अशोक मगर, आनंद कुदळे ओबीसी संघर्ष समिती अध्यक्ष, कविता वाळुंज खेड तालुका अध्यक्ष, माजी अध्यक्ष संतोष शिंदे, हेमंत श्रीखंडे, पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक पंडीत, उपाध्यक्ष शहर हरिभाऊ शेळके, नागेश भोपुलकर सर्व पि ची विभाग अध्यक्ष मारुती काटके (भोसरी), संदीप महाले चिंचवड (वाल्हेकर वडी ), दत्ता खरे (निगडी ), किशोर पवार (वाकड), आशिष जाधव संघटक नितीन कुटे, राजू माने, भोसरी शंकर गायकवाड (मोशी ), राजू लोखंडे, महेंद्र बीडकर (पिंपरी ), अंकुश जाधव ( सागवी पिंपळे गुरव), चेतनमहाले, अभय श्रीमगले (भूमकर वस्ती), नानासाहेब सूर्यवंशी, हरी सूर्यवंशी, भारत चिते, प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र चित्ते इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. “महाविकास आघाडी म्हणजे अर्धवट काम करणारे तिरुपतीचे न्हावी आहेत,” अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या राजकीय भाषणात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर ठिकठिकाणी नाभिक समाज आंदोलन करुन रावसाहेब दानवे यांचा निषेध करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.