पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महिलेला निर्वस्त्र करून डोक्यात धारदार शस्त्राने वार करून महिलेचा निघृणपणे खून

मावळ : शेतातील पडाळीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महिलेला निर्वस्त्र करून डोक्यात धारदार शस्त्राने वार करून महिलेचा निघृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि.13) दुपारी मावळ तालुक्यातील तळपेवाडी माळेगाव बुद्रुक येथे घडली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

फसाबाई साळू निसाळ (वय 36 रा. तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक ता. मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत फसाबाई निसाळ व त्यांचे पती साळू निसाळ यांनी धरणाच्या शेतात फरसबी लावण्याचे काम केले. दुपारी पडाळीवरच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी फसाबाई निसाळ गेल्या व साळू निसाळ शेतात काम करत होते. सायंकाळी पडाळीवर गेले असता, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निर्वस्त्र पडल्याचे पाहिले. वडगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती देताच पोलीस हवालदार श्रीशल कंटोळी व होमगार्ड सुरेश शिंदे यांनी धाव घेतली.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.