पुणे हादरलं..! एकतर्फी प्रेमातून तरुणाने दहावीच्या वर्गात घुसून मुलीवर केले वार

पुणे : लवकरच दहावीच्या ऑफलाईन परीक्षा सुरु होणार असून प्रत्येक शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी निरोपसमारंभ आयोजित केले जात आहे. मात्र, पुण्यातील एका शाळेमध्ये निरोपसमारंभ सुरु असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून एका विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेत घुसून वर्गात जाऊन एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार पुण्यातील वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत घडला आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून त्यावेळी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ सुरु होता. आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीवर वार केल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.