किरकोळ कारणावरून छातीत चाकूने भोकसून तरुणावर खुनी हल्ला ; पिंपरी चिंचवड हादरले

पिंपरी चिंचवड : किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणाच्या छातीमध्ये चाकू खूपसून गंभीर जखमी केले. तसेच तरुणाच्या भावासह वडिलांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी येथे मंगळवारी (दि. १५) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

अमोल किसन पवार ( वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी अमोल यांचे वडील किसन पवार (वय ४२, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष बाळू गायकवाड (वय २२), कार्तिक, शाहिद साजीद शेख, शाहनवाज साजीद शेख (वय १८, सर्व रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी संतोष गायकवाड आणि शाहनवाज शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साडू पांडूरंग सर्जेराव डिकोळे आणि आरोपी यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला होता. यात डिकोळे यांना मारहाण झाल्याने त्यांना पाहण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची मुले अमाले व सूरज हे तिघे जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांची मुले अमोल व सूरज यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण केली.

‘रुक तेरे को खतमीच कर देता, असे आरोपी शाहनवाज शेख हा अमोल याला म्हणाला. त्यानंतर अमोलच्या छातीच्या मधोमध चाकू खूपसून परत काढून डाव्या बाजूला पोटात खुपसत असताना चाकू जर्किनमध्ये अडकून राहिला. छातीतून रक्त येत असल्याने अमोल खाली पडला. त्यास गंभीर जखमी करून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. आरोपींनी अमोलच्या छातीत चाकू खूपसून त्याला जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, फिर्यादी किसन पवार यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.