नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई
पिंपरी : विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत म्हणजे मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या टोळीवर मोक्कांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. तर यापूर्वी या टोळीवर पुण्यात देखील मोक्का कारवाई झाली होती.
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय – 36) नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध), संदीप गोविंद वाळके , सचिन गोविंद वाळके (दोघे रा. विधाते वस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश (रा. पिंपळे गुरव) आणि ॲड. चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर (रा. लिंक रोड, बाणेर) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करुन खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे आरोपींच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून वर्चस्वासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!