खेड- राजगुरुनगर येथील कल्याण मटका जुगारावर ग्रामीण पोलीसांचा छापा

पुणे : खेड- राजगुरुनगर येथील कल्याण मटका जुगारावर ग्रामीण पोलिसानी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडुन रोख रक्कम १९ हजार ५०० व इतर मुद्देमाल असा एकूण ३४ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निसार बाबुलाल शेख (वय ३७), सचिन सुर्यकांत मोरे (वय ५३, दिंगबर चांगदेव कडेकर वय३१, सर्व राहणार राजगुरुनगर ता खेड जि पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पुणे ग्रामिण जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये नव्याने रुजू झालेले प्रोबेशनरी आयपीएस तेगबिर सिंग संधू व दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते यांच्या पथकाला आदेश दिले होते. यानुसार पथकाने खेड- राजगुरुनगर येथे कल्याण मटका जुगारावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाई मध्ये मटका घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन यांच्याकडून रोख रक्कम १९५०० व इतर मुद्देमाल असा एकूण ३४५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते हा मटका मित्रसेन ऊर्फ सॅम डोंगरे रा राजगुरूनगर याच्यासाठी चालवतात अशी माहिती मिळाली. हा मटका रशीद महमुद शेख यांच्या मालकीच्या खोलीमध्ये चालवला जात होता यामुळे या पाच ही इसमांवर मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी आयपीएस तेगबीर सिंग संधू , पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, मोसिन शेख, पोलीस नाईक किरण कुसाळकर, तुषार ढावरे या पथकाने केली .

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.