पूर्व हवेलीत तिथीनुसार शिवजयंती जोरदार साजरी.
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती परिसरात आज तिथीनुसार असणारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.लोणी स्टेशन परिसरातील भगवा प्रतिष्ठानातर्फे गेल्या दहा वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते परंतु कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊन मूळे गेली दोन वर्षे कार्यकर्त्यांना शिवजयंती साजरी करण्यात आली नसल्याने यंदा मोठ्या जोशात शिवजयंती साजरी होत असल्याची माहिती भगवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजित बडदे यांनी दिली.
परीसरात शिवज्योत आगमन, प्रतिमापूजन, पालखी मिरवणुका यांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते.भगवा प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी लोणी स्टेशन येथील म्हसोबा मंदिर येथे ७ ते ११ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवपरिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक चित्तरंजन गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिवरायांच्या पालखी मिरवणूकमध्ये भगवे फेटे व टोपी घातलेले नागरिक ढोल-ताशाच्या गजरात शिवरायांचा जयघोष करीत होते. मिरवणुकीतील शिवाजीमहाराजांची प्रतिमा व पालखी फुलांनी सजवलेली लक्ष वेधून घेत होती.यावेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य नासिर पठाण,सामाजिक कार्यकर्ते निलेश अशोक काळभोर,गौरव देवराम काळभोर,ज्ञानेश्वर नामुगडे,अविनाश बडदे,दीपक काळभोर,अभिजित बडदे,तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम,शब्बीर पठाण,आरपीआयचे अभिजित पाचकुडवे,लहुजी शक्ती सेनेचे हवेली तालुका अध्यक्ष विजय सकट, विजय बोडके तसेच परिसरातील अनेक शिवभक्त या सोहळ्यास उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!