कुख्यात गुंड गज्या मारणेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल,

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 22 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.ओळख वाढवून मैत्री केली आणि नंतर शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार 2020 ते 2022 या कालावधीत घडला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची इतर मित्राच्या माध्यमातून आरोपीची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर प्रथमेश याने या मुलीला खडकवासला धरण परिसरात फिरायला नेले. तेथून परत येत असताना एका हॉटेलवर घेऊन जात तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.या सर्व प्रकरणाचे चोरून अश्लील व्हिडिओ काढले. दरम्यान हे व्हिडिओ फिर्यादीने डिलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली.त्यानंतर फिर्यादीने या कृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने तीला धमक्या दिल्या. आणि काय करायचे ते कर मी कुणाला घाबरत नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३७६, ५०४, ५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे कलम ६६ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.