ठाकरे सरकार हे नक्की जनतेचे मुख्यमंत्री आहेत का?मुख्यमंत्रीसाहेब वेळ असेल तर जरा इकडेही लक्ष द्या….

मुंबई : महाविकास आघाडीला गेल्या आठवड्यात अडीच वर्षे झालीत.अनैसर्गीक तयार झालेल्या या सरकार मध्ये शह-कटाशह देता देता जवळपास अडीच वर्षे खाल्ली. राज्याच्या विकासावर कधी कोण काही बोलताना दिसतच नाही.कोरोणातुन अद्याप सामान्य नागरिक असो वा कोणीही सावरलेले नाहीत.कोरोणाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी घरभाडे देउ नका,मी अमुक करेल तमुक करेल अशी बरीचशी बडबड दूरचित्रवाणीवर केली परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणास कसला लाभ मिळाला असेल तर तो अपवादच.महाराष्टात आर्थिक विवंचनेतुन कुटुंबासहित आत्महत्या अशा बातम्या सर्वसामान्यांना वाचनात येतात तर आपल्या सरकारला का दिसत नाहीत,का त्यांच्या पर्यंत अशा बातम्या वगळुण जातात का?तेही लक्षात येत नाही.महाराष्ट्रात सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप,सुडबुद्धीने केलेल्या कारवाई या खेरीज काही आढळून येत नाहीत.मुख्यमंत्र्यांच्या भाषणात टोमण्यांखेरीज काही आढळून येत नाहीत.नुकताच मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला की सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत घर देणार,सर्वसामान्यांना अगदी चीड भरणारा निर्णय म्हणता येईल,या निर्णयाविरोधात समाज माध्यमातून जोरदार टीकाही होत आहे.नक्की ठाकरे सरकार हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत का?हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न तर नसेल ना….

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.