वेशांतर करून पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यानी लाखाची खंडणी मागणाऱ्या तीन पोलीस मित्रांच्या आवळल्या मुसक्या

पिंपरी चिंचवड : ‘आम्ही जमिनीची प्रकरणे सोडवतो, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यसोबत चांगली ओळख आहे,’ अशी बतावणी करून  पोलीस मित्रांनी एका तरुणास एक लाखाचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. या याबाबतची माहिती तरुणाने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना कळवली. त्यानंतर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वत: या कारवाईत सहभागी होत, वेशांतर करून भक्ती शक्ती चौक, निगडी येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचला, आणि दोन महिला आरोपी यांच्यासह तिघांना अटक केली. ही कारवाई पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्‍ये शनिवारी  (दि.26) रात्री 9 ते 9.30 दरम्यान केली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

रोशन संतोष बागुल (वय 22), गायत्री रोशन बागुल (वय 22, रा. देव इंद्रायणी सोसायटी देहुगाव, मुळगाव दिंडोरी, नाशिक) आणि पुजा विलास माने (वय 22, रा. देव इंद्रायणी सोसायटी देहुगाव, मुळगाव हडपसर, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर, ज्ञानेश्वर (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अजित हाके (रा. त्रिवेणीनगर) हे दोन आरोपी फरार आहेत.विन्सेंट अलेक्झांडर जोसेफ (वय 52, ताम्हाणे वस्ती, मोरे वस्ती, चिखली) यांनी याबाबत देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे विन्सेंट जोसेफ यांच्या खोलीत भाड्याने रहायला होते. आरोपी रोशन याने तो सायबर क्राईमचा माणूस असून महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे बनावट ओळखपत्र तयार केले. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आम्ही जमिनीची प्रकरणे सोडवतो, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यसोबत चांगली ओळख आहे,’ अशी बतावणी केली. फिर्यादी यांचा जमिनीचा मॅटर सोडवून देतो पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेत याची सर्व माहिती पोलिसांना दिली.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वत: या कारवाईत सहभागी होत वेशांतर केले आणि पोलिसांची टीम तयार केली. आणि कृष्णप्रकाश यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी हॉटेल पुणे गेट येथे सापळा लावला. ५०० रुपयाची एक खरी नोट वरतीलावून त्याच्या आत मुलांच्या खेळण्यातील नोटा लावून एक लाखाचा बंडल तयार केला. पोलीस आयुक्त आणि आरोपी जवळच बसले होते, तरीही आरोपीने आयुक्तांना ओळखले नाही. पैसे स्विकारल्यानंतर आयुक्तांनी आरोपीला पकडले. यासह दोन महिला आरोपींना देखील अटक केली आहे. तर, दोन आरोपी घटनास्थळावरून फरार आहेत.

आरोपीला देण्यासाठी नकली पैशाचे बंडल तयार केले होते, ते आरोपीच्या खिशातून बाहेर काढण्यात आले. आरोपी जवळ सायबर क्राईम, महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे लिहलेले बनावट ओळखपत्र सापडले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.