ओटास्कीम येथे शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक करून विक्री करणाऱ्याला अटक ; 36 हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी चिंचवड :शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक करून विक्री करणाऱ्या आरोपीवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून अटक केली. त्याच्याकडून 36 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ओटास्कीम, निगडी येथे रविवारी (दि. 27) सकाळी साडेसात वाजता करण्यात आली.

इस्माईल अल्लाबक्ष भाटघर (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह नितीन हिरालाल छाजेड (वय 56, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अतुल लोखंडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इस्माईल भाटघर हा इंदिरानगर ओटास्किम निगडी पुणे येथे त्याचे राहते घरी गुटख्याची साठवणुक करुन त्या गुटख्याची दुचाकीवरून वाहतुक करुन त्याची ओटास्किम निगडी परिसरात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी सकाळी भाटघर हा त्याच्या दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी सकाळी साडेसात वाजता कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 80 हजारांची एक दुचाकी आणि 36 हजार 447 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा (आर एम डी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको गोल्ड, विमल पान मसाला, वि-१ तंबाखु, रजनीगंधा पान मसाला, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा) असा एकूण 1 लाख 16 हजार 447 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.