पिंपरीत गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; ११ किलो गांजा जप्त

पिंपरी चिंचवड : गांजाची साठवणुक करुन स्वतःच्या आर्थिक
फायद्यासाठी विक्री करणाऱ्या आरोपीवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी करत दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ किलोचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी ( दि. २७ ) रोजी एस के वाघेरे कॉम्प्लेक्स, , नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे, पिंपरी येथे करण्यात आली.

गौतम किसन गायकवाड (वय ४७, रा. एस के वाघेरे कॉम्प्लेक्स, चौथा मजला, फ्लॅट नं. ८, नवमहाराष्ट्र शाळेचे मागे, पिंपरी पुणे), दिपक ऊर्फ दिपेश इंद्रेकर (वय २४, रा. भाटनगर, पिंपरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्याच्यासह  रेखा पोपटसिंग तामचीकर (वय ३८ , रा. भाटनगर, पिंपरी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस के वाघेरे कॉम्प्लेक्स, चौथा मजला, फ्लॅट नं. ८, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे, पिंपरी येथे एक व्यक्ती हा गांजाची नावाचा साठवणुक करुन स्वतःच्या आर्थिक
फायद्यासाठी विक्री करीत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामजिक सुरक्षा पथकातील पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८३ हजार ७५० रुपये किमतीचा ११ किलो वजनाचा गांजा, ६ हजार रोख रक्कम, २ हजार ३३० रुपये किमतीचा स्टॅपलर, पिन बॉक्स/ प्लास्टिक पन्नी, २ हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व ६ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३ लाख १ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.