आंबेगाव येथील ब्रम्हा लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; २ महिलांची सुटका

पुणे  : आंबेगाव बु. येथील ब्रम्हा लॉजवर छापा टाकून अवैधपणे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा सामजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश करत उत्तर प्रदेशातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. तर तीन दलालांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विपुल बाबासाहेब बेलदरे ( वय ३६,रा.आंबेगाव बु, ता. हवेली) आणि विक्रम करण सोनार (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विपुल हा हॉटेल मालक तर विक्रम हा व्यवस्थापक आहे. येथे वेश्‍याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. यामध्ये मुळच्या उत्तरप्रदेशातील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करुण घेण्यात येत होता. त्यांना वेश्‍याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या संजय महतो, केदार मंडल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पुराणिक करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.