अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना साखर घेण्याचे आवाहन
पुणे:- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च २०२२ या तीन महिन्याची साखर प्रती माह एक याप्रमाणे ३ किलो साखर स्वस्त धान्य दुकानदाराना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या तीन महिन्याची साखर प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!