पक्क्या अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन पूर्ववेळ घेण्याचा (अपॉईंटमेंट) प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पूर्ववेळ घ्यावी लागणार आहे. 9 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 6 एप्रिल, 16 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 13 एप्रिल, 23 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 20 एप्रिल, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरासाठी 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्जदाराने पक्क्या अनुज्ञप्तीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.