लोणावळ्यात चार कोटींची रोकड जप्त ; दोघांना अटक
पुणे :लोणावळा ग्रामिण पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी कारवाई करत ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महेश नाना माने (रा. विटा, जि. सांगली), विकास संभाजी घाड़गे (रा. शेटफळ जि.सांगली) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, द्रुतगती मार्गावरुन अवैध शस्त्र व पैशांची बेकायदशीर वाहतूक होणार असल्याची माहीती मिळाली होती. त्या बातमीची शहानिशा व खातर जमा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटिल पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनखाली सोमवारी (ता.२८) रात्री महामार्गावर एक पथक नेमण्यात आले होते.
दरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एक संशयित कार मुंबईकडून पुण्याकडे जाताना मिळून आली. तिला थांबवण्यासाठी इशारा केला असता तेव्हा ती पुढे निघून जाऊ लागली. त्यावेळी पोलीस पथकाने कौशल्याने तिला ताब्यात घेण्यात आले सदर कार (KA 53 MB 8508) क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार चेक करण्यात आली. तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात चेक केले असता 4 करोड रुपयाची रोख रक्कम मिळून आली.सदर रक्कमेबाबत विचारपूस करता त्या संबंधी कागदपत्रे अथवा पुरावे व वाहतूक परवाना व त्याबाबतचे कारण त्यांना सांगता आले नाही.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!