डेलनेट च्या गव्हर्निंग बोर्ड वर पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा यांची निवड.

पिंपरी : शिक्षण संस्थांमधील ग्रंथालयांच्या कामकाजासंबंधात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क अत्तथात अर्थात डेलनेट या नवी दिल्ली येथील संस्थेच्या 2022 ते 2024 करिता गव्हर्निंग बोर्डच्या निवडणुकीत पुण्यातील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) ग्रंथपाल पवन शर्मा यांची सर्वाधिक मताधिक्याने निवड झाली आहे.

नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेली डेलनेट ही संस्था ग्रंथालयांच्याबाबतीत भारतासह परदेशातही कार्यरत आहे. सध्या डेलनेट सोबत भारतातील 7448 संस्था आणि परदेशातील 23 संस्था सदस्य म्हणून जोडलेल्या आहेत.

DELNET ला सुरुवातीला नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (NISSAT), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, भारत सरकार द्वारे समर्पित होते. त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, माहिती तंत्रज्ञान विभाग, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांनी डेलनेट ला पाठबळ दिले आहे.

डेलनेटच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावरील ग्रंथालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह विविध अभिनव व विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविणे,ग्रंथालयांच्या कामकाजात अद्ययावत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथालयांमध्ये परस्पर समन्वय, माहितीचे आदानप्रदान व सहकार्य वाढविण्याचा डेलनेटद्वारे प्रयत्न केला जाणार असल्याचे येणार असल्याचे पवन शर्मा यांनी यावेळी सांगितले. पवन शर्मा यांची निवड झाल्याबद्दल यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.