पुणे- नगर रोडवर चोरीच्या उद्देशाने फिरणार्या दोन सराईत आरोपींना अटक, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कामगिरी

पुणे : पुणे- नगर रोडवर चोरीच्या उद्देशाने फिरणार्या दोन सराईत आरोपींना पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे

उमेर मुस्ताक फारुखी (वय २४ वर्ष रा केज जिल्हा बीड), करण पांडुरंग सुरवसे (वय १८ वर्ष रा आंबेजोगाई जिल्हा बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

३१ मार्च रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह रात्रगस्त करीत असताना शिक्रापूर परिसरामध्ये एका विना नंबर प्लेट च्या मोटर सायकल वरून दोन इसम चोरीच्या उद्देशाने संशयित रित्या फिरत असले बाबत पथकाला माहिती मिळाली होती. या बातमीवरून पथकाने शिक्रापूर येथील मलठण फाट्याजवळील साई सहारा पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या दोघां जवळ एक विना नंबर प्लेट ची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल मिळून आली अधिक चौकशी केली असता ही मोटर सायकल त्यांनी दोन दिवसापूर्वी चाकण येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

उमेर मुस्ताक फारूखी हा अट्टल चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी मारहाण, चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट या सारखे तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. पुढील अधिक तपास शिक्रापूर पोलीस स्टेशन करीत आहे

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, मोसिन शेख, पथकाने केली .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.