माहिती अधिकारात माहिती मिळवण्याची पद्धत,कारण,अवधी,शुल्क, मुदत,सविस्तर माहिती

माहिती मिळविण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत 

 • इंग्रजी किंवा हिंदी किंवा त्या प्रांताच्या इतर कार्यालयीन भाषेत टंकलिखीत किंवा स्वतःच्या हस्ताक्षरात माहिती अधिकार्‍याच्या नावे अर्ज करावा व त्यात जी माहिती हवी असेल त्या माहितीसाठी मागणी करावी.
 • ज्या माहितीची मागणी करत आहात त्याचे कारण देण्याची गरज नाही;
 • विहित शूल्क भरा. [दारिद्य्ररेषेखाली नसल्यास]

माहिती मिळविण्यास किती अवधी लागेल

 • अर्ज केल्यापासुन ३० दिवसांपर्यंत
 • एखाद्या व्यक्तिच्या स्वातंत्र्याशी किंवा जीवनमरणाशी संबंधित माहितीसाठी ४८ तास.
 • जर अर्ज सहायक माहिती अधिका-याकडे केलेला असेल तर वरील कालावधीत अधिक ५ दिवस जोडावेत.
 • तिस-या पक्षाचे हित सामिल असल्यास अवधी ४० दिवस देखील होऊ शकतो. (जास्तीत जास्त वेळ + पक्षाला प्रतिनिधित्व करण्यासाठी दिला गेलेला वेळ)
 • दिलेल्या काळात माहिती न पूरविणे हा नकार समजावा.

याकरिता किती शूल्क असते?

 • निर्धारित केलेले आवेदन शुल्क हे विहित असले पाहिजे.
 • जर अधिक शुल्काची गरज असेल तर तसे लेखी व सर्व हिशोबासह आकारले जाईल.
 • आवेदनकर्ता माहिती अधिकार्‍याकडे भरलेल्या शूल्काच्या फेरविचारासाठी मागणी करु शकतो.
 • दारिद्र्यरेषेखालील लोकांकडून कोणतेही शूल्क आकारले जाणार नाही.
 • जर माहिती अधिकारी निर्धारित वेळेत माहिती देऊ शकले नाही तर त्यांना आवेदनकर्त्याला निशूल्क माहिती द्यावी लागेल.

माहिती देण्यास नकाराची कारणे काय असू शकतात

 • अशी माहिती जिचे प्रकटीकरण करण्यास बंदी असेल. (एस.८)
 • जर माहिती राज्याव्यतरिक्त इतर कोण्या व्यक्तिच्या कॉपीराईटमध्ये मोडत असेल.
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.