‘यूपीए’ अध्यक्षपदासाठी शरद पवारांचेच नाव समर्पक-हेमंत पाटील दिल्ली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह सपा,बसपा प्रमुखांची भेट घेणार

मुंबई

देशभरात भाजपचा विजयरथ रोखण्याचे मोठं आव्हान विरोधकांसमोर उभे आहे.लोकशाहीत प्रभावी विरोधकांची भूमिका महत्वाची आहे.पंरतु, जोपर्यंत विरोधकांच्या एकजुटीला प्रभावी चेहरा मिळणार नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भाजपची विजयी घोडदौड रोखता येणं अशक्य असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. कॉंग्रेस सह छोट्या-मोठ्या प्रादेशिक पक्षांनी एकत्रित येऊन विरोधकांची आघाडी उभारली तर भाजपला रोखता येवू शकते. यूपीएच्या सक्षम नेतृत्वासाठी त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचेच नाव समर्पक आहे. पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवून विरोधकांच्या नेतृत्वाला एक प्रभावी धार मिळेल, असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केली.

पवारांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांना एकजुट करण्यासह त्यांचे मत जाणून घेण्यासाठी येत्या ६ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांची देखील ते भेट घेतील. यूपीए ला जोपर्यंत प्रभावी नेतृत्व मिळणार नाही तोपर्यंत भाजपचा पराभव अशक्य आहे. शरद पवार यांचा २०२४ चा अजेंडा ठरला आहे.विरोधकांची वज्रमुठ ते बांधू शकतात.त्यांच्या अनुभवाचा तसेच राजकीय प्रगल्भतेचा विरोधकांना फायदा झालेला आहे.

सर्व पक्षांना एकत्रित आणण्याचे काम ते प्रभावीपणे करीत भाजप विरोधात एक सक्षम पर्याय देशवासियांना देवू शकतात. भाजप विरोधी १० राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात येणार असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.गुजरात विधानसभा निवडणूक पुर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे पवारांना युपीएचे अध्यक्ष बनवले तर विरोधकांना प्रभावी नेतृत्व मिळेल. हिंदु महासभेच्या एका गटाने देखील शरद पवारांचे नेतृत्व मान्य केले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल देखील पवारांच्या नावासंबंधी सकारात्मक आहे. पवारांच्या नेतृत्वासंबंधी इतर प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांसोबत त्यामुळे चर्चा करणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.