धक्कादायक! गरम लोखंडी झाऱ्या, सिगरेटचे चटके देत तरुणीसोबत शरीरसंबंधाठी जबरदस्ती

पिंपरी चिंचवड : दोन अनोळखी तरुणांनी एका तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केला. तसेच जाळून टाकण्याची धमकी देत तिला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोखंडी झाऱ्या गरम करून त्याचे चटके देत तरुणीवर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. ही धक्कादायक घटना हिंजवडी येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

याप्रकरणी पिडीत १८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी गुरुवारी (दि. ७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी तरुणी घरी होती. त्यावेळी आरोपी दोन तरुण तिच्या घरी आले. एकाने ‘तुमच्या रूममधून पाण्याचा कॅन घ्यायचा आहे’ असे म्हणून घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी तरुणीसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी स्टीलचा झाऱ्या आरोपीला फेकून मारला.

आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला घरात बोलावून घेतले. त्यानंतर तरुणीच्या पायावर बसून तिचे तोंड दाबून तिच्यावर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. आरोपींनी तरुणीला जाळून टाकण्याची धमकी दिली. पेटलेल्या सिगारेटने तरुणीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने झटका दिल्याने आरोपीने तरुणीला सिगारेटचा चटका देऊ शकले नाहीत.

त्यांनतर आरोपींनी झाऱ्या गॅसवर गरम केला आणि त्याने तरुणीच्या हातावर चटका दिला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पीडित तरुणी हि महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पीडितेने पहिले बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रिक्षातून जात असताना रिक्षा चालकाने सिगारेटचे चटके दिल्याचे तिने म्हटले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पासून चौकशी केली असता प्रकार वेगळा असल्याचे समोर आले. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता हिंजवडी येथे घरात घुसून दोन तरुणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सिगारेट आणि झऱ्याचे चटके दिल्याचे सांगितले. भीतीपोटी खोटी माहिती दिल्याचे तिने सांगितले. यानंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.