खराबवाडी छातीत चाकू भोसकून एकाचा खून ; २ तासात आरोपी गजाआड
पिंपरी चिंचवड : अपशब्द वापरल्याने झालेल्या वादात छातीत चाकू भोसकून एकाचा खून केला. पवार वस्ती, खराबवाडी, ता. खेड, पुणे येथे आज (शुक्रवारी, दि.०८) ही घटना घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी दोन तासांत अटक केली आहे.
शिवम कैलास नारायण यादव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अर्जुन रामलखन यादव (वय 23, रा. बिष्णुपुरा, ता. भातपारानी, जि. देवरीया, उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन यादव याचे लग्न जमल्याने धर्मेंद्रसिंग हरिसिंग सिसोदीया हा आरोपीच्या घरी जेवण करण्यासाठी गेला होता. धर्मेंद्रसिंग याने अपशब्द वापरल्यामुळे अर्जुन यादव याने धर्मेंद्रसिंग यास शिवीगाळ करुन जेवण न देता
घराबाहेर काढले. धर्मेंद्रसिंग याने घडला प्रकार त्याच्या मित्रांना फोनवरुन सांगितला. धर्मेंद्रसिंग यांचे मित्र जाब विचारण्यास अर्जुन यादव याच्या घरी गेले. त्याठिकाणी अर्जुन यादव व आलेल्या लोकांमध्ये वाद झाला व अर्जुन यादव याने शिवम कैलास नारायण यादव याच्या छातीत चाकू भोसकून खून केला.
पोलिसाना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली आणि गुन्हा केलेल्या आरोपी बाबत परीपुर्ण माहीती प्राप्त करुन गुन्हा करणारे व्यक्तीचा त्याचे रुमवर शोध घेतला असता तो बॅग घेवून त्याचे मुळ गावी झाशी उत्तरप्रदेश येथे पळुन जाण्याचे तयारीत असताना सदर आरोपीस चाकण एसटी स्टॅण्ड येथुन शिताफिने ताब्यात घेतले
त्याच्याकडे पोलिसांनी चोकशी केली असता “पार्टीमध्ये भांडण झाल्याच्या कारणावरुन चिडुन जावून मी शिवम यादव यास चाकुने मारले आहे.” अशी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास रिपोर्टसह म्हाळुगे चौकी, चाकण पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.सदर बाबत म्हाळुगे चौकी पोलीस ठाणे येथे ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!