मोठी बातमी ! अॅड गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी

मुबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चप्पल फेक प्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना एसटी कामगारांना भडकावल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावताना इतर 109 जणांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

कोर्टाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्व सदावर्ते यांनी कोर्टात काही आरोप केले आहेत. मला डायबिटीजची औषधे दिली गेली नाही, काल मला घरातून ताब्यात घेण्यात आले तेव्हा मला इजा झाली असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. कालच्या घटनेच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

सदावर्ते यांनी 7 एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण केलं. त्यात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट करत 12 तारखेला आम्ही बारामतीत येऊ, घरी राहून दाखवा, असं आव्हान सदावर्ते यांनी पवारांना दिलं होतं. सदावर्ते यांनी आझाद मैदानात आधी जल्लोष करून नंतर कर्मचाऱ्यांची माथी भडकवल्याचा आरोप या एफआयआरमध्ये नोंदवला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणणे आणि परवानगी शिवाय इतरांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या शिवाय आंदोलनाच्या दिवशी काही आंदोलकांनी मद्यप्राशन केलं होतं, असंही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.