सदावर्तेंना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; आता 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

मुबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर आंदोलक करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. कालच्या घटनेच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद
आज सुनावणी दरम्यान अनेक खळबळजनक दावे सरकारी वकिलांनी केलेत.  सदावर्तेंनी हल्ल्याच्या दिवशी नागपूरमध्ये दोन फोन केले, असा दावा सरकारी वकिल अॅड प्रदीप घरत यांनी केला.

 

सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी करत अॅड प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांच्या चौकशीत आणखी ४ जण या घटनेत गुंतलेले आहेत अशी माहिती कोर्टात दिली.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

सदावर्ते चौकशीला पूर्णपण सहकार्य करत नाहीत, तसंच चंद्रकांत सूर्यवंशी याचं नाव चौकशीत समोर आल्याचं अॅड प्रदीप घरत यांनी सांगितलं. सदावर्ते यांनी मीडियाला आपल्या योजनेची माहिती दिली होती. त्याच दिवशी सदावर्ते यांनी सकाळी नागपूरला एक कॉल केला होता. कोनाल फोन केला हे शोधून काढायचं आहे अशी माहिती समोर आली होती.

धक्कादायक म्हणजे या हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याचं ठरलं होतं. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावलं, याप्रकरणी चार जणांचा ताबा पाहिजे असं अॅड प्रदीप घरत यांनी सांगितलं.

 

बाहेरून कोण पाठींबा देत आहेत का याबाबत अधिक चौकशी करायची आहे, सदावर्ते यांच्या मोबाईलवरून 31 मार्चला बोलणं झालं, मात्र त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते सिमकार्ड त्यांनी नष्ट केलं, ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी 11.35 वाजता सदावर्ते यांनी नागपूरला whtsapp कॉल केला, त्यानतंर परत 1.30  त्यांनी नागपुराला पुन्हा कॉल झाला, आणि पत्रकार पाठवा असे ते कॅलमध्ये म्हणाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

गेले सहा महिने संप सुरु असून यासाठी पैसे कुठन येतायत याचा तपास करायचा आहे असं अॅड प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितलं.

सदावर्ते यांच्या वकीलांचा युक्तीवाद
सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानंतर गुणरत्न सदावर्ते यांचे वकील अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.
सदावर्तेनी पैसे घेतले असा आरोप केला जातो आहे पण एसटी कर्मचाऱ्यांनी  तशी तक्रार केली आहे का ? 530 रुपयांप्रमाणे जर प्रत्येक व्यक्तीकडून जमवले 1. 50 कोटीहून अधिक जमले असतीलही. मात्र याबाबत एकही कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली नाही असा दावा अॅड. कुलकर्णी यांनी केला.

 

कर्मचारी आत्महत्या करत होते मात्र त्यांच्याबद्दल साधी सहानुभूतीही कोणाला नव्हती, एसटी कर्मचारी client होते म्हणून सदावर्ते यांच्या घराबाहेर जमा होत होते असं अॅड. कुलकर्णी कोर्टात सांगितलं.

 

तसंच धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी जखमी झाला, कर्मचारी तिथे मारामारी करायला गेले नव्हते, कर्मचाऱ्यांचा हेतू लक्षात घ्या त्यांना कोणता गंभीर गुन्हा करायचा नव्हता, असं सांगत अॅड कुलकर्णी यांनी हल्ला होणार हे  पोलिसांना माहिती होतं  मग पोलिस बंदोबस्त का नव्हता असा सवालही उपस्थित केला.

 

ज्या दिवशी घटना घडली होती तेव्हा सदावर्ते घटनास्थळी नव्हते, चंद्रकांत सूर्यवंशी या पत्रकाराशी बातचीत केल्याचं सांगतात, मात्र ती घटना सर्व मीडियाने हे कव्हर केली. सदावर्ते यांच्यावर केलेले आरोप साफ चुकीचे असून ज्या फोन बाबत आणि सिमकार्ड बाबत पोलिस बोलत आहेत त्या सिम कार्डची वॅलिडिटी ३१ मार्च पर्यंत होती म्हणुन त्या दिवसापर्यंतच वापरला आणि त्या नंतर तो फोन देखील वापरण्यात आला नाही असा युक्तीवाद अॅड कुलकर्णी यांनी केला.

 

नागपूर मधील एका व्यक्तीशी बोलणं झालं आहे पण कोणाशी बोलणे झाले आहे हे शोधू शकले नाही असं कधी होतं का? असा सवालही अॅड. कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.