मावशीच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद , 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे :  घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला  गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 96 हजार 085 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात गुन्हे उघडकीस आले आहे.

मोहन देविदास बनसोडे (वय २१ वर्षे,रा.लेन नं ७,पाटील इस्टेट,शिवाजीनगर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मावशीच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

लोणीकंद पोलीस ठाण्यात  दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी मोहन देविदास बनसोडे हा पाटील इस्टेट येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट पुलाच्या खाली सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करुन त्याची 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी घेऊन पोलीस कस्टडीत चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने त्याच्या मावशीच्या मदतीने पुणे शहर आणि परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.

आरोपीकडून लोणीकंद, डेक्कन , समर्थ , सिंहगड रोड, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेले 7 गुन्हे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख 96 हजार 085 रुपये किमीतीचे सोन्या – चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, काही दिवसापूर्वी गुन्हयातील सहआरोपी असलेल्या मावशीचा इलेक्ट्रीक शॉक लागुन मृत झाल्याचे सांगितले आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.