मोक्कातील सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून ; हडपसर परिसरातील घटना

पुणे : येरवडा कारागृहात नुकताच मोक्कातील गुन्ह्यातून कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा कोयता, पालघन व दगडाने ठेचून खून केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. या घटनेत त्याचा साथीदारही गंभीर जखमी झाला. ही घटना काळेपडळ हडपसर येथील म्हसोबा मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर मंगळवारी रात्री घडली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

सनी ऊर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे, तर परवेज ऊर्फ सोहेल हैदरअली इनामदार (वय २०, रा. तिरंगा चौक, हडपसर) हा गंभीर जखमी झाला. याबाबत सनीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी सचिन नवले, आकाश कसबे, राहुल कोळी, आकाश काकडे, गोट्या लोहार, संकेत पांडवे, आकाश कोटावळे (सर्व रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो ९ एप्रिल रोजी कारागृहातून बाहेर आला होता. सनी व सोहेल हे दोघेही कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना भेटायला त्यांची मित्रमंडळी काळेपडळ येथील म्हसोबा मंदिर चौकात येत होती. यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या राहुल कोळी व आकाश काकडे यांचा त्यांच्यावर रोष होता. त्यांनी सनी व सोहेल यास काळेपडाचे भाई होताय का? तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, मंगळवारी सनी व सोहेल दोघे चौकात बसले असताना आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन तेथे आले. त्यांनी कोयता, पालघन आणि लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करत दोघांना गंभीर जखमी केले. यामध्ये सनीचा जागेवरच मृत्यू झाला.

खुनाची घटना समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक सावळाराम साळगावकर करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.