रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ; संघ स्वयंसेवकांची घोष मानवंदना

पिंपरी चिंचवड :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

सर्वप्रथम सकाळी ७ वाजता पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घोष वादनाने ( बॅंड पथक ) मानवंदना देण्यात आली. यावेळी घोषावर विविध रचनांचे वादन करण्यात आले.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालक विनोद बन्सल,पुणे विभाग सहकार्यवाह दिलीप कंद, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, समरसता विभागाचे विलास लांडगे व महेंद्र बोरकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.

समरसता मंचातर्फे पाणपोई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थानी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते. १९८९ पासून कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षाचा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर्षी समरसता मंचाच्या पाणपोई चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांचे हस्ते करण्यात आले. अभिवादन स्थळी येणारे नागरिक या पाणपोईचा लाभ घेत आहेत.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.