लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या ; प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : तरुणीसोबत पाच वर्ष प्रेमसंबंध ठेऊन तिला लग्नाचे आश्वासन दिले. नंतर लग्नासाठी नकार दिला. या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पप्पू उर्फ सुनील शाम गोलाईत (वय २५, रा. परभणी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी मयत तरुणीच्या आईने 13 एप्रिल रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी आणि आरोपी यांचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. तरुणी ही वेगळ्या जातीची आहे. तो उच्चवर्णीय आहे अशा कारणावरून ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तरुणीला फोनवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.