डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती कदम-वाकवस्ती मध्ये मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी

कदमवाकवस्ती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती कदमवाकवस्तीमध्ये मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. कदमवाकवस्ती येथे पुढील काही दिवस रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत व मोठ्या मैदानांतही महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त लोणी स्टेशन येथील घोरपडे वस्ती येथे मान्यवर कांशीरामजी साहेब विचारमंच पुणे यांच्यावतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी कोरोना काळात मदत केलेल्या आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्तींना या विचारमंचाकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ यांच्या मातोश्री सुलोचना बाबुराव ओव्हाळ यांना मरणोत्तर आदर्श माता पुरस्कार देण्यात आला.तर लोकमतचे वार्ताहर पंढरीनाथ नामुगडे व पत्रकार दिगंबर जोगदंड, राम भंडारी,गणेश गोरे यांना निर्भीड पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल कदमवाकवस्तीच्या पोलीस पाटील प्रियंका भिसे,आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव दीपक आडाळे,सामाजिक कार्यकर्ते विनोद बेंगळे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर शिव-फुले-शाहू-आंबेडकर, विचारधारा विशेष कार्याबद्दल बहुजन मुक्ती पार्टीचे अमोल लोंढे यांना पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ,परमेश्वर शिंदे,विशाल पेटकर,ऍडव्होकेट श्रीकांत भिसे,जालिंदर आडाळे यांनी केले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.