शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.. मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगेश यांच्या पत्नी रजनी यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.रजनी या ४२ वर्षांच्या होत्या.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

मिळालेल्या माहितीनुसार,  नेहरूनगर येथील केदारनाथ मंदिर परिसरामध्ये कुडाळकर राहतात. रविवारी सायंकाळी सरवजन घरात असतानाच त्यांच्या पत्नी रजनी यांनी स्वत:च्या बेडरुममध्ये  गळफास लावून आत्महत्या केली. रजनी या मंगेश कुडाळकर यांच्या द्वितीय पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी मंगेश यांच्या पहिल्या पत्नीचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी रजनी यांच्याशी विवाह केला होता. रजनी आणि मंगेश यांना दोन मुलं आहेत. वर्षभरापूर्वी मंगेश यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा कुर्ल्यामध्ये अपघात झाला होता या अपघातामध्ये त्याचा देखील मृत्यू झाला होता..

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कुर्ल्याच्या नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. रजनी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यासंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सह पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांना महिलेने गळफास घेतल्याची माहिती कॉलवर मिळाली होती.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

आमदाराच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पंचनामा आणि चौकशी करत होते. या प्रकरणासंदर्भात नेहरूनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.