विमाननगर परिसरात स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय ; ‘जस्ट डायल’वरील फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे :विमाननगर येथील एका आलिशान स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली तर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या पाच जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्पाचा व्यवस्थापक सुफीयान अहमद अली (वय २२, रा. विमाननगर, मूळ रा. आसाम) आणि त्याचा साथीदार अब्दुल मलिक मुफूर अली (वय २१, रा. येरवडा, मूळ रा. आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या स्पाचा मालक-भागीदार महंमद अब्दुल हचिब (वय २५, रा. आसाम), अन्वर दाऊदभाई अहमदाबादी (वय ६८, रा. विमाननगर) आणि शबनम सुलेमान शेख (वय ३२, रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक इरफान पठाण यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमान नगर परिसरातील मेरियम बॉडी स्पा या ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी त्यांना या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या ठिकाणाहून ३५, २४ आणि २२ वर्षीय मुलींची सुटका केली. आरोपी या तरुणींना पैशाचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

विमाननगर परिसरातील एखाद्याने जस्ट डायल या फोन सुविधेमध्ये मसाज पार्लरबाबत कोणत्याही प्रकारची माहितीची विचारणा केली की, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर मेरीयन मसाज पार्लरचे मेसेज येणे सुरु होत आणि त्यातून त्या व्यक्तीला ग्राहक बनवून, मसाजचे नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता.पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.