व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वारंवार बलात्कार; तरुणाच्या घरच्यांनीही तरुणीला धमकावले संबंध

पिंपरी चिंचवड : मैत्रीचे संबंध निर्माण करून तरुणीला प्लॉट दाखवायला म्हणून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२१ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत थरमॅक्स चौक, निगडी येथे घडला.

पीडित तरुणीने शनिवारी (दि. २३) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण धोंडीबा गुंजवटे, भाऊ राहुल गुंजवटे, बहिण, आई (सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्रीचे संबंध निर्माण केले. तिला प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून नेले आणि कोणाच्यातरी घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी त्याचा व्हिडीओ आरोपीने बनवला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणाने फिर्यादी तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध केले.

आरोपी प्रवीण याने फिर्यादी यांना त्यांच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले असताना त्याने दुस-या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले. फिर्यादीस हा प्रकार समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठले. त्याच्या घरच्यांना तरुणीने विचारणा केली असता आरोपी प्रवीणचा भाऊ, बहिण आणि आई यांनी फिर्यादी तरुणीला धमकी देऊन घराबाहेर काढले. तिला मारहाण करून ‘तुला जे काय करायचे आहे ते तू कर. आमच्या घरासासमोर पुन्हा यायचे नाही’ असे म्हणत तरुणीला आरोपींनी हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.