आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस चा काळाबाजार गुन्हेशाखेकडून उघड
पुणे : आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 च्या पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २२ सिलेंडर गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 कडील स्टाफ कोथरूड, वारजे माळवाडी पो स्टे चे पेट्रोलिंग करीत असताना स्टाफमधील धनंजय ताजणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ए आर आय, कंपनी जवळील मोकळे मैदान, केळेवाडी, कोथरूड, पुणे या ठिकाणी काही इसम एका टेम्पोच्या आडबाजूस घरगुती गॅस सिलेंडर लोखंडी टाक्यामधून मोठ्या ( कमर्शियल) सिलेंडर टाकीमध्ये ( पाईप ) मशीन द्वारे गॅस ट्रान्सफर करीत आहे.
वरील बातमीचे ठिकाणी स्टाफने जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 3 व्यक्ती मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, घरगुती सिलेंडर गॅस टाकीमधून मोठया ( कमर्शियल ) सिलेंडर गॅस टाकी मध्ये गॅस भरून त्याची लोकांना विक्री करतो असे सांगितले. सदर टेम्पोची पाहणी करता टेम्पो मध्ये एकुण ३२,८००/- रु किं च्या एकुण २२ सिलेंडर गॅस टाक्या १,५०,०००/- रु किं चा १ टेम्पो व १,०००/- रु किं गॅस ट्रान्सफर करणारी (पाईप) असा एकुण १,८३,८००/- रु किं चा मुद्देमाल मिळून आल्याने तो दोन पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भा दं वि कलम २८५,२८३,२८७,२८८ व जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ८ सह स्फोटक पदार्थ अधिनियम १८८४ चे कलम ७ व ८ अन्वये कोथरूड पो स्टे येथे गुन्हा नोंद करून पुढील कारवाईकामी कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1, अजय वाघमारे यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!