कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला पेट्रोल टाकून पेटवलं, दोघांचाही मृत्यू ; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारास कामावरुन काढल्याच्या कारणावरुन, त्याने एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्राेल टाकून पेटती सिगारेट तिच्या अंगावर टाकून देत तिला पेटवून दिल्याचा प्रकार साेमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडगावशेरी परिसरात घडला. या घटनेत मालकिणीसह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

मिलिंद गाेविंदराव नाथसागर (वय-३५,रा.वडगावशेरी,पुणे, मु.रा.परभणी) व बाला नाेया जॅनिंग (३२,रा.वडगावशेरी,पुणे , मु.रा.ओरिसा) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

बाला ही मूळची ओरिसाची असून मागील दहा वर्षांपासून वडगावशेरी येथील रामचंद्र सभागृह येथे ए टू झेड टेलरिंगचे दुकान आहे. तिचा घटस्फोट झाला असून ती तिच्या दहा वर्षांच्या मुलासह या ठिकाणी राहत होती. मिलिंद हा मूळचा परभणीचा असून मागील दोन वर्षापासून वडगाव शेरी येथे बाला हिच्या दुकानात काम करीत होता. मागील आठवड्यात त्याला बाला यांनी कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग डोक्यात ठेवून मिलिंद याने बाला हिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेत बाला व मिलिंद दोघेही गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान मिलिंद याचा पहाटे पाच वाजता तर बाला हिचा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवाने मृत्यू झाला.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

सोमवारी रात्री कामावरून काढल्याच्या रागातून ही गंभीर घटना घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मयत आरोपी मिलिंद नाथसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत वाचवायला गेलेला प्रशांत कुमार नावाचा तरुणही भाजल्याने जखमी झाला आहे. त्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव,  गुन्हे निरीक्षक सुनील थोपटे, महिला उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक शिसाळ करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.