हडपसर – फुरसुंगी परिसरातील मटक्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 6 जणांवर कारवाई

पुणे :  हडपसर – फुरसुंगी येथे सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून तेथे जुगार खेळणारे व खेळविणारे अशा 6 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 6 हजार 690 रुपये रोख, जुगार साहित्य, 6 मोबाईल असा 19 हजार 690 रुपयांचा माल जप्त केला आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

प्रफुल्ल मोहन कामठे  (वय 35, रा. चांभळी, सासवड, ता. पुरंदर),
किरण भैरु चव्हाण (वय 29, रा. हरपळे वस्ती), दीपक ललन निसाद  (वय 25, रा. कोंढवा), विलास शरनाप्पा चौगुले (वय 48, रा. फुरसुंगी), प्रकाश तानाजी हरपळे  (वय 33, रा. फुरसुंगी), भीमा किसन कदम  (वय 60, रा. फुरसुंगी)  अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

हडपसर परिसरातील फुरसुंगी गावातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका, सोरट खेळविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता छापा टाकण्यात आला असता या ठिकाणीं आरोपी मटका व सोरट जुगार घेताना आणि जुगार खेळताना आढळून आले.त्यांच्याकडून 6 हजार 690 रुपये रोख, जुगार साहित्य, 6 मोबाईल असा 19 हजार 690 रुपयांचा माल जप्त केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.