मांग गारुडी समाजाच्यावतीने केशव राखपसरे यांचा भव्य सत्कार
कदमवाकवस्ती : मांग गारुडी समाज युवक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी केशव राखपसरे यांची निवड झाल्याने कदमवाकवस्ती येथील पालखीस्थळावर मांग गारुडी समाज महाराष्ट्र राज्य व मांग गारुडी समाज युवक संघ यांच्यावतीने संयुक्तरित्या सत्काराचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक भागातून मांग गारुडी समाजातील लोकांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी मांग गारुडी युवक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीश सकट, टायगर ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.तानाजी जाधव,मा.जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे,हवेली पंचायत समितीचे मा.उपसभापती युगधंर काळभोर,कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड,युवा नेते चित्तरंजन गायकवाड,लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर,राजेंद्र खांदवे,पूजा लोंढे,बाळासाहेब राखपसरे,पोलीस पाटील प्रियंका भिसे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोडके आणि नवनाथ राखपसरे यांनी केले तर विजय राखपसरे यांनी आभार मानले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता आयोजकांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली होती.या कार्यक्रमास सुनील लोंढे,अभिजित बडदे,ज्ञानेश्वर नामगुडे, अमोल टेकाळे,विजय सकट,अमोल लोंढे,राहुल बोडके,शुभम बोडके,विक्की काळे,शंकर लोंढे,रोहित राखपसरे,राजू कसबे,राम कसबे,सोनू लोंढे,अरुण काळे,अमित राखपसरे,राहुल राखपसरे,सुनील भाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!