गुजरात येथे झालेल्या कराटे स्पर्धेत चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

 

कदमवाकवस्ती : गुजरात आनंद येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या पश्चिम विभागीय कराटे स्पर्धेत गोल्डन सियारा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत नंदिनी चव्हाण या विद्यार्थिनीने कुमितेमध्ये ९ वयोगट व २३ किलो वजनगटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर हर्षिका खामकरने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.या स्पर्धेत महाराष्ट्र,गोवा,गुजरात मध्यप्रदेश,राजस्थान,दमन,छत्तीसगड या राज्यातून दोन हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला.महाराष्ट्र राज्यातून जवळपास तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सर्वच खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

कराटे मुख्यप्रशिक्षक हेमंत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन या संस्थेत खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रथमच क्लबमधून या दोन खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी झाली होती.दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत मोठे यश संपादित केले. विजयी खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक व अभिनंदन कमिटी चेअरमन शैलेश चंद,मुख्याध्यापिका प्रीती खनगे,विद्यार्थी पालक यांनी केली.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.