अट्टल वाहनचोरांना जेरबंद करत १५ वाहने जप्त, गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुणे : अट्टल वाहनचोरांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडुन  तीन लाख रुपये किंमतीची एकूण १५ वाहने केली जप्त करण्यात आली आहे.

निलेश बाळासाहेब शिवरकर (वय ३३ वर्षे, रा. म्हातोबाची आळंदी,
पानमळा, ता. हवेली, जि. पुणे) व प्रशांत संपत चव्हाण (वय ३४ वर्षे, रा. निमगाव म्हाळुगी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचा गुन्हा करणा-या आरोपींच्या बाबत युनिट ६ पथकाला माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या परवानगीने सदरचा गुन्हा हा तपासकामी गुन्हे शाखा,युनिट-६
कडे वर्ग करुन घेण्यात आला. नमुद गुन्हयाचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, गुन्हा करणा रेआरोपी हे वाघोली बाजारतळ येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा, युनिट ६ च्या पोलीस पथकाने वाघोली बाजारतळ येथे सापळा रचून आरोपींना त्यांच्याकडील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोटार सायकलबाबत त्यांच्याकडे तपास करता त्यांनी ती मोटार सायकल ही आळेफाटा येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करून मा. न्यायालयात हजर करून त्यांची दिनांक ३ मे  पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आली.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे तपास करता त्यांनी पुणे शहरामधील विविध ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एकूण तीन लाख रूपये किंमतीच्या एकूण १५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून १५ वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.