पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रीच्या संबंधातून लॉजवर नेऊन नशेचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

पिंपरी चिंचवड : मैत्रीच्या संबंधातून लॉजवर नेऊन मद्यातून नशेचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत दोन ते तीन लाख रुपये घेतले. हा प्रकार २०१६ ते गुरूवार ( दि. ५ ) २०२२ या कालावधीत बालेवाडी, चिंचवड येथील लॉजवर घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

पंकज अनिल खंडागळे ( वय २८ रा. थेरगाव ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना मैत्रीच्या संबंधातून राज हॉटेल बालेवाडी येथे घेऊन गेला. येथे फिर्यादीला मद्य पाजून त्यामध्ये नशेचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करेल अशी धमकी आरोपीने फिर्यादी यांना दिली. त्यानंतर कामिनी हॉटेल चिंचवड येथील लॉजवर सहा ते सातवेळा घेऊन जावून फिर्यादी यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

याला फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपीने काढलेले व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन बलात्कार केला. आरोपीने वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून २ ते ३ लाख रूपये रोख रक्कम घेतली. तसेच फिर्यादी यांना शारीरीक आणि मानसिक त्रास देऊन त्याच्यावर बलात्कार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.