मावस भावावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना
पुणे : पूर्ववैमनस्यातून मावस भावावर तलवारीने वार करुन दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निसार युसुफ शेख, रमजान साहील शेख , नवाब निसार शेख (रा. गाडीतळ, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत ईब्राहिम मुबारक शेख (वय ३३, रा. ताडीगुत्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान शेख हा फिर्यादी यांचा मावस भाऊ आहे. फिर्यादी व त्यांच्या भावामध्ये जुनी भांडणे आहेत. फिर्यादी व त्यांचा भाऊ महंमद जबी शेख हे ४ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता गाडीतळ येथील दुर्गामाता मंदिराजवळ थांबले असताना आरोपी तेथे आले. निसार शेख याने “इसको अभी खतमही कर डालते है” असे म्हणून जीव मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार करुन जखमी केले. नवाब शेख याने “इन दोनोको अभी दुनियासे उठाते है” असे म्हणून हातातील चाकूने फिर्यादीचा भाऊ महंमद याच्या डाव्या बाजूला भोसकून गंभीर जखमी केले. रमजान याने शिवीगाळ करुन लोखंडी पाईपाने दोघा भावांना मारहाण केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गाडे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!