साईड न दिल्याने तरुणाचा खून; मुळशी तालुक्यातील घटना

पुणे :  मोटारसायकलला जाण्यास साईड न दिल्याने चिडून तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा खून केला.  ही घटना मुळशी तालुक्यातील उरवडे ते लवासा रोडवर आंदगावातील तक्षशिलानगर येथे जाणार्‍या रस्त्यावर रविवार दुपारी दीड वाजता घडली

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३८, रा. तुंगी ता़ मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी राजेश अंकुश कुंवर (वय ३१, रा. भुशी, रामनगर, लोणावळा) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे

फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ सुभाष वाघमारे मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी एकाला फिर्यादीच्ने साईड न दिल्याच्या कारणावरुन त्यांच्या वाद सुरु झाला. त्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेऊन त्यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण केला. त्याने व दुसर्‍या मोटारसायकलवरुन आलेले दोघे अशा तिघांनी सुभाष वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव तपास करीत आहेत.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow
0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.