आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळणार

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवडकरांचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठणठणीत होत असून आठवड्याच्या आत त्यांना डिस्चार्ज दिला जावू शकतो. नुकतेच आमदार जगताप यांनी हॉस्पिटलच्या बाल्कनीत उभे राहून कार्यकर्त्यांना व समर्थकांना हातवारे करत मी ठणठणीत असल्याबद्दल सांगितले. त्यांची हि प्रसन्न मुद्रा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

PicsArt_22-01-07_20-29-42-555
PicsArt_01-11-07.00.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.38.11
Picsart_22-03-30_13-10-46-629
Picsart_22-03-30_13-11-06-703
InShot_20220414_133443392
previous arrow
next arrow

बरोबर महिन्यापूर्वी आमदारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांनी बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले. पहिला आठवडा ते अत्यवस्थ होते. काही काळ त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आला होता.  त्यामुळे सर्वत्र उलटसुलट
चर्चा सुरु होत्या. भाऊंची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात देव देवताना नवस आणि महाआरत्या करण्यात आल्या.

त्यांच्या तब्बेतीचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी नेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, माजी मंत्री गिरीश महाजन आदींनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. भाऊंच्या अनेक समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी मोरया गोसावी मंदिरासह अनेक ठिकाणी होमहवन, यज्ञयाग केले त्याला अखेर यश आले. स्वतः अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतून एक अत्यंत महत्वाचे इंजेक्शन मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.

PicsArt_03-15-06.53.52
PicsArt_03-15-06.54.12
PicsArt_03-15-06.53.35
PicsArt_03-17-11.41.00
PicsArt_21-12-24_13-44-33-203
Picsart_22-03-30_13-11-35-784
previous arrow
next arrow

त्या इंजेक्शनचे तीन डोस दिल्यानंतर पंधरा दिवसांत भाऊंच्या तब्बेतीत लक्षणीय फरक पडला. उपचाराला त्यांचे शरिर प्रतिसाद देत असल्याने नातेवाईक आणि हितचिंतकांचा उत्साह वाढला. आज सकाळी भाऊ थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून बंद काचेच्या खिडकितून आपल्या चाहत्यांना हात करताना सर्वांनी सुस्कारा सोडला. मोरया पावला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कदाचित आठवडाभरात भाऊंना घरी सोडण्यात येईल, असे त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले.
महिन्यापूर्वी आमदार जगताप यांची तब्बेत खूपच ढासळली होती. तब्बेत सुधारत असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगत होते, पण उपचार कऱणाऱ्या डॉक्टरांनी माहिती देण्यास नकार दिल्याने जगताप यांचे चाहते संभ्रमात पडले होते. वास्तवात आमदार जगताप हे मृत्यूशी झुंज देत होते. तीस वर्षांच्या संघर्षमय राजकिय जीवनात भलेभले हल्ले परतवून लावणाऱ्या या योध्याने जीवाशी आलेले हं संकटसुध्दा परतवून लावले आहे. यमराजाशी दोन हात करुन यशस्वी मुद्रेने ते परतले आहेत. महापालिका निवढणुकिसाठी ढोल नगारे वाजत असताना ज्यांच्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली ते कर्तेकरवीते आमदार जगताप आजारी पडल्याने त्यांच्या समर्थकांची द्विधा मनस्थिती झाली होती. आज हॉस्पिटलच्या खिडकितून आमदारांनी सर्वांना हात हालवत, हसतमुखाने प्रतिसाद दिल्याने भाजपासह सर्व उच्छुकांचा उत्साह दुनावला आहे. आमदार जगताप यांच्याशिवाय भरभक्कम नेतृत्व नसल्याने भाजपाची गाळण उडाली होती, आता तेसुध्दा सावरले आहेत. आमदार जगताप यांना लवकर बरे वाटू दे यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रार्थना सुरू केली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.