पोलिस चौकीत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस चौकीत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

स्वारगेट: भर रस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी महर्षीनगर पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने ओढणीने आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी 19 वर्षांच्या तरुणीवर आत्महत्येस प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व मोहसीन खान हे दोघे ओळखीचे आहेत. तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी मोहसीन तन्वीर खान (वय 21, रा. गुलटेकडी) याला अटक केली आहे.

खान याने या 28 ऑगस्ट रोजी फोन करून गुलटेकडी येथील व्हेईकल डेपोच्या ग्राउंडमध्ये तिला बोलविले. ही तरुणी रात्री 11 वाजता तेथे गेली असता खान याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेची तक्रार देण्यासाठी फिर्यादी आपल्या नातेवाईकांना घेऊन मंगळवारी महर्षीनगर पोलिस चौकीत आली होती. तिची तक्रार नोंदवून घेत असताना पहाटे 4 वाजता ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्यावर आता आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *