गंज पेठेतील एका खोलीतून साडेदहा लाखांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 1, 2022
- No Comment
पुणे: गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गंज पेठेतील एका खोलीतून साडेदहा लाखांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला.
याप्रकरणी ख्वाजा ऊर्फ साहिल अस्लम मुलाणी व शादाब मुश्ताक नाईकवाडी (राहणार दोघे गंज पेठ) यांच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार संजय भापकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल़या माहितीनुसार, गुटखा विक्रीस राज्यात बंदी असतानादेखील दोघांनी त्याची बेकायदा साठवणूक करून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, गुटखा सापडला.