- September 15, 2022
- No Comment
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणारा आरोपी गजाआड
थेरगाव: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या रिक्षा चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना 1 डिसेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत थेरगाव येथे घडली.
विकास सतिश गायकवाड (वय 32 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 15 वर्षांची आहे.तिला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले.पीडित मुलगी 8 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला.यावरून वाकड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.