- September 22, 2022
- No Comment
पुणे:MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: MPSC ची तयारी करणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
त्रिगुण कावळे (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जालन्याचा रहिवासी आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या त्रिगुण कावळे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर या तरुणाच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्याने आपण निराशातून आयुष्य संपवत आहे असे नमूद केल आहे. त्रिगुण कावळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
त्रिगुण कावळे हा तरुण मुळचा जालन्यातील आहे. जानेवारी 2021 पासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. यावर्षीच त्याने राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली होती. गांजवे चौक परिसरात एका भाड्याच्या घरात तो राहत होता. दरम्यान तो रहात असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने आपण नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे देखील त्याने त्या चिठ्ठीत दिले आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. यातील काही तरुणांना यश मिळतं तर काहींना यश मिळत नाही. मात्र छोट्याशा कारणावरून काही करून टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. यापूर्वी देखील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्यांना प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे.